Tushar Apte : अंबरनाथचे वादग्रस्त स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांचा राजीनामा
बदलापूर खाजगी शाळेतील दोन चिमुकल्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी त्या शाळेचे सचिव तुषार आपटे यांना भाजपाने स्वीकृत नगरसेवक पद दिलं होतं.
लोकशाही मराठीने ही बातमी लावून धरल्यानंतर अखेर तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. तुषार आपटे यांनी बदलापूर नगर परिषदेतील उपमुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर तो ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर केला जाईल, मात्र देशभर गाजलेल्या प्रकरणातील शाळेचे सचिव तुषार आपटे हे सह आरोपी असताना भाजपाने त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिलं कसं असा संताप बदलापूरकरांनी व्यक्त केला आहे.
तुषार आपटे बदलापूर शाळेतील दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा कथित चकमकीत मृत्यू झाला होता. तपासादरम्यान शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तुषार आपटे त्या काळात शाळा व्यवस्थापनात सचिव पदावर कार्यरत होता.
विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर तुषार आपटे तब्बल 44 दिवस फरार होता. अखेर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अवघ्या 48 तासांत आपटेला जामीन मंजूर झाला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आपटे जामिनावर बाहेर आहे.
