अंबरनाथ तालुक्यातील डोणे गावातील पोटनिवडणुकीत मनसेने मारली बाजी !

अंबरनाथ तालुक्यातील डोणे गावातील पोटनिवडणुकीत मनसेने मारली बाजी !

अंबरनाथ तालुक्यातील डोणे गावातील पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजी मारली असून सुजाता पालांडे या बहुमताने विजयी झाल्या आहेत.
Published by  :
Team Lokshahi

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील डोणे गावात झालेल्या ग्रामपंचात पोटनिवडणुकीत मनसेचा उमेदवार सुजाता पालांडे या बहुमताने विजयी झाल्या आहेत. पॅनल नंबर एक डोणे गावात पोटनिवडणुकीत दोन उमेदवार उभे होते. चारुशीला पालवे वंचित बहुजन आघाडी ठाकरे गट आणि सुजाता पालांडे या दोघांमध्ये निवडणूक सुरू होत्या.

रविवारी पार पडलेल्या मतदान नंतर आज सकाळी अंबरनाथ तहसील कार्यालयात दोन्ही उमेदवारांचे मतदान मोजणी करताना सुजाता पालांडे या बहुमताने विजय झाल्या असून चारुशीला पालवे यांचा पराभव झाला आहे.

गावात रखडलेल्या विकास कामाला गती देण्याचं काम सुजाता पालांडे करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com