गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी; अमोल कोल्हे म्हणाले...

गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी; अमोल कोल्हे म्हणाले...

केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.

केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, आज आपला कांदा उत्पादक शेतकरी रडतोय. 2 डिसेंबरला कांद्याला भाव होता 40 रुपये. यांनी निर्यातबंदी केली कांद्याचा भाव गेला 10 रुपयांवर. निर्यातच नाही कांद्याची म्हणून आमचा कांदा उत्पादक शेतकरी रडतोय महाराष्ट्रातला डिसेंबरपासून रडतोय. त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते काही म्हणत नाहीत. आज गुजरातमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फक्त गुजरातमधल्या हा. फक्त गुजरातमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा दोन हजार मेट्रिक टनच्या निर्यातीवरची बंदी उठवली.

तसेच ते पुढे म्हणाले की, भाकरी महाराष्ट्राची खायची आणि चाकरी गुजरातची करायची. हीच जर यांची नियत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने, शेतकऱ्याच्या लेकरांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की जर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात तुम्ही माती कालवता आणि भलं तुम्ही गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे करता तर कशाला येता आमच्याकडे मते मागायला. गुजरातमध्येच जाऊन मतं मागा. असे अमोल कोल्हे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com