Pune Ganpati Visarjan News : पुण्यात गणपती विसर्जनाच्यावेळी दुर्दैवी घटना
Pune Ganpati Visarjan News : पुण्यात गणपती विसर्जनाच्यावेळी दुर्दैवी घटना; एका युवकाचा मृत्यू Pune Ganpati Visarjan News : पुण्यात गणपती विसर्जनाच्यावेळी दुर्दैवी घटना; एका युवकाचा मृत्यू

Pune Ganpati Visarjan News : पुण्यात गणपती विसर्जनाच्यावेळी दुर्दैवी घटना; एका युवकाचा मृत्यू

ण्यातील मुळशी परिसरात गणेश विसर्जनाच्या वेळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Pune Ganpati Visarjan News : पुण्यातील मुळशी परिसरात गणेश विसर्जनाच्या वेळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लक्ष्मण चव्हाण असे या बेपत्ता तरुणाचे नाव असून तो मूळचा लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील रहिवासी आहे. पिरंगुटजवळील मुळा नदीच्या किनारी ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

लक्ष्मण चव्हाण सध्या पिरंगुट येथे वास्तव्यास असून, एका खासगी रुग्णालयात काम करतो. गणपती विसर्जनासाठी तो आपल्या मित्रांसह मुळा नदीच्या किनाऱ्यावर गेला होता. विसर्जनादरम्यान पाण्यात उतरल्यानंतर, अचानक तो पाण्यात खोल गेले आणि वाहून गेला. त्याच्या मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि ग्रामीण पोलीस यांच्याद्वारे घटनास्थळी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र संध्याकाळी अंधार आणि जोरदार प्रवाहामुळे शोध थांबवावा लागला. बुधवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.

पुण्यात मंगळवारी सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पडले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान उत्साहाचे वातावरण असले तरी काही ठिकाणी काळजाला भिडणाऱ्या घटना घडल्या. लक्ष्मण चव्हाण यानेही आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नदीच्या पात्रात प्रवेश केला, पण त्यातून तो परत बाहेर आला नाही. सध्या शोधकार्य सुरूच असून प्रशासनाकडून नागरिकांना विसर्जनावेळी काळजी घेण्याचे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com