Anandraj Ambedkar
महाराष्ट्र
Anandraj Ambedkar : आनंदराज आंबेडकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; नेमकी काय चर्चा?
आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले असून अनेक गाठीभेटी होताना पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Anandraj Ambedkar ) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले असून अनेक गाठीभेटी होताना पाहायला मिळत आहे. अनेक बैठकांचे आयोजन केलं जात असून जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत असून नंदनवन या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
या चर्चेत रिपब्लिकन सेनेला 10 जागा द्या, असे आनंदराज आंबेडकरांनी मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
आनंदराज आंबेडकरांनी घेतली शिंदेंची भेट
जागा वाटपाची घोषणा झाल्यानंतर रात्री उशिरा घेतली भेट
दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा
