Andekar Family : आंदेकर कुटुंब उमेदवारी अर्ज भरू शकणार; कोर्टाने दिली परवानगी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Andekar Family ) बंडू आंदेकर कुटुंबासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. बंडू आंदेकर कुटुंब पालिका निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. बंडू आंदेकर , लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर हे पुणे महापालिका निवडणुक लढवणार आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर याच्यासह त्याच पूर्ण कुटुंब न्यायालयीन कोठडीत आहे.
पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया करू शकता अशी सूचना न्यायालयाने दिली असून बंडू आंदेकर हा कुख्यात गुंड असून त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर ही माजी नगरसेविका आहे तसेच सोनाली आंदेकर ही माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी आहे. यातच आता आंदेकर कुटुंब उमेदवारी अर्ज भरू शकणार असून कोर्टाने आंदेकर कुटुंबाला उमेदवारी अर्ज भरण्यात परवानगी दिली आहे.
लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास कोर्टाने परवानगी दिली असून कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे पोलिसांना कोर्टाने आदेश दिले आहेत. आंदेकर कुटुंब आता जेलमधून निवडणूक लढवणार असून उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
आंदेकर कुटुंब उमेदवारी अर्ज भरू शकणार
उमेदवारी अर्ज भरण्यास कोर्टाने दिली परवानगी
पोलीस संरक्षणामध्ये आंदेकर कुटुंब भरणार अर्ज
