Anjali Damania
Anjali Damania

Anjali Damania : '...पण अजून FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव नाही', अंजली दमानियांचा हल्लाबोल

पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Anjali Damania) पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस कंपनीने 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अंजली दमानिया यांनी ट्विट करत परत निशाणा साधला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, 'आज पुणे जमीन घोटाळ्याच्या २१ वा दिवस. पण अजून FIR मधे पार्थ पवारचे नाव नाही.'

'जमीन खरेदी करणारी कंपनी आमडेआ एंटरप्राइजेस च्या प्रत्येक डॉक्युमेंट मधे पार्थ पवारचेच नाव आहे . मी हे सगळे डीटेल रोज सोशल मीडिया वर टाकणार आहे. ह्या डॉक्युमेंट मधे कोण आहे ? पार्थ की दिग्विजय ? बघू किती दिवस नाव घालत नाहीत' असे अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

Summery

  • 'आज पुणे जमीन घोटाळ्याच्या 21वा दिवस'

  • पण अजून FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव नाही- दमानिया

  • 'अमेडिया कंपनीच्या कागदपत्रांत पार्थ पवारचं नाव'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com