Anjali Damania
Anjali Damania

Anjali Damania : तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अंजली दमानियांचा पाठिंबा, ट्विट करत म्हणाल्या...

नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Anjali Damania) नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यासाठी देशभरातून अनेक साधू-महंत येत असतात त्यांच्या निवासासाठी तपोवनामध्ये साधुग्राम नगरी वसविली जाते. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे.

त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे.यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटी देखील याला विरोध करताना पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार, राजकारणी यावर व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता अंजली दमानिया यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, 'कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडे तोडण्याविरोधात आंदोलन करणाऱ्या नाशिककरांना पाठिंबा'असे म्हणत त्यांनी तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Summery

  • नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू

  • तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अंजली दमानियांचा पाठिंबा

  • 'पूर्ण समर्थन', म्हणत दिली प्रतिक्रिया

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com