Anjali Damania : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया आक्रमक; आज अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Anjali Damania) उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया आक्रमक झाल्यात. मुख्यमंत्र्यांनी 24 तासांत अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 24 तासात अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अन्यथा दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं होते.
याच पार्श्वभूमीवर आज अंजली दमानिया अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी दिल्लीसाठी त्या रवाना होणार आहेत. काल दमानिया यांनी अमित शाह यांच्या भेटीसाठी इ मेल केला होता. मात्र अद्यापही अमित शाह यांच्याकडून भेटीचे वेळ देण्यात आलेली नाही. तरी देखील अमित शाह यांना भेटण्यासाठी अंजली दमानिया ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अमित शाह आणि अंजली दमानिया यांची भेट होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया आक्रमक
आज अमित शाहांना भेटण्यासाठी दिल्लीला जाणार
आज दुपारी दिल्लीसाठी होणार रवाना
