Bandu Andekar : बंडू आंदेकरसह आंदेकर टोळीवर अजून एक गुन्हा दाखल
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Bandu Andekar) राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली . 15 नोव्हेंबरला मतदान पार पडेल तर 16 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यातच पुणे महानगरपालिकेची निवडणूक बंडू आंदेकर लढणार असल्याची माहिती मिळत होती.
यातच आता बंडू आंदेकर सह आंदेकर टोळीवर अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दिवसभर बंडू आंदेकरच्या घरी पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत 17 लाखांपेक्षा अधिकची रोकड, 2 पिस्तूल आणि एक एअर गन जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
आंदेकर टोळीतला नंबरकारी अमन पठाण याच्यासह आंदेकर टोळीतल्या इतर काही जणांवर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून काल दिवसभर बंडू आंदेकरच्या घरी पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली. घरात छापेमारी करत असताना शस्त्र आढळून आल्याने आंदेकर आणि त्याच्या टोळीतल्या सदस्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Summery
बंडू आंदेकर सह आंदेकर टोळीवर अजून एक गुन्हा दाखल
आंदेकर टोळीतला नंबरकारी अमन पठाण याच्यासह आंदेकर टोळीतल्या इतर काही जणांवर गुन्हा दाखल
काल दिवसभर बंडू आंदेकरच्या घरी पोलिसांची छापेमारी
