Nilesh Ghaiwal
महाराष्ट्र
Nilesh Ghaiwal : निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल
भीतीदायक रिल्स आणि पोस्टद्वारे दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा
थोडक्यात
निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल
सोशल मीडियात दहशतीचे व्हिडिओ पोस्ट केल्यानं गुन्हा
भीतीदायक रिल्स आणि पोस्टद्वारे दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा
(Nilesh Ghaiwal) गुंड निलेश घायवळचा पाय आणखी खोलात असल्याचे पाहायला मिळत आहे. निलेश घायवळ याच्यावर आता पुन्हा एकदा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर समाजात भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल निलेश घायवळवर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून Instagram आणि facebook अकाउंटवर भीतीदायक रिल्स आणि पोस्ट टाकत दहशत पसरवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
