महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे २५ लाख सीएम फंडात  जमा करणार; आप्पासाहेब धर्माधिकारींची घोषणा

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे २५ लाख सीएम फंडात जमा करणार; आप्पासाहेब धर्माधिकारींची घोषणा

राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण 2022चा पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला.

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण 2022चा पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. समाजसेवा ही सर्वांत श्रेष्ठ आहे, असे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हणत महाराष्ट्र भूषण पुरस्कार रक्कमेचे २५ लाख रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची घोषणा केली.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे २५ लाख सीएम फंडात  जमा करणार; आप्पासाहेब धर्माधिकारींची घोषणा
त्याग आणि समर्पणामुळेच आप्पासाहेबांचा सन्मान : अमित शाह

देशाचा गृह खाते व सहकार सांभाळताना एवढे काम असूनही आज त्यांनी उपस्थिती दर्शविली. हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार हा नेहमीच मोठा असतो. आज कार्याची दखल घेऊन तो पुरस्कार दिला. हा कार्याचा गौरव आहे या कार्याचे श्रेय आपल्या सर्वांना जाते. महाराष्ट्र भूषण ही प्रेरणा होती. एकाच घरात दोन पुरस्कार हे महाराष्ट्रात कुठेही झालेले नाही, असे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हंटले आहे.

सुरुवात आपण खेडेगावातून केली. कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी मला नकोय. कारण प्रसिद्धीतून काहीही प्राप्त होत नाही. आज प्रत्येक मनुष्याला आवश्यकता आहे ती मानवतेची. मानवता हा धर्म प्रत्येकात रुजू व्हायला हवा. नानासाहेबांनी ८७ वर्षापर्यंत काम सुरु ठेवले. आणि माझा श्वास सुरु राहिल तोपर्यंत मीही काम करत राहील. माझ्या पश्चात सचिन हे काम सुरु ठेवेल, असे त्यांनी सांगितले.

कार्य उत्तम केले जाते तेव्हाच देहाला सन्मान मिळतो. कार्य श्रेष्ठ आहे म्हणून देहाचा सन्मान केला जातो. कुठलाही पुरस्कार उच्च नसतो समाजाचे व देशाचे ऋण आपल्यावर आहे ते फेडण्यासाठी काय करावे, हेच आम्ही सांगतो. सेवा अखंडपणे सुरु ठेवावी.

समाजसेवा ही सर्वांत श्रेष्ठ आहे. धर्माधिकारी प्रतिष्ठान मी का उभे केले? तर लोकांना एकत्रित उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध असावी. रोपण म्हणजे फक्त वृक्षारोपण करायचे नाही. तर झाडे लावायची, तशी ती जगवायचीही. या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावावी. तर वेळच्या वेळी त्या झाडांची निकामी राखावी. लहान मुलांप्रमाणे वृक्षाची लागवड करून निगा राखा. त्यानंतर माणसाप्रमाणे ते मोठे झाल्यावर स्वतः जगते, असेही आप्पासाहेब धर्माधिकारींनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com