Election : राज्यात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी प्राप्त अर्जांची आजपासून होणार छाननी; राजकीय पक्षांसमोर बंडखोरांना रोखण्याचे आव्हान
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.
नामांकन अर्ज मागे घेण्याची 21 तारखेपर्यंत तारीख आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख 21 नोव्हेंबर असणार असून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादी 25 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांसमोर बंडखोरांना रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल होणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summery
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले
राज्यात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी आले अर्ज
राजकीय पक्षांसमोर बंडोबांना थंड करण्याचं आव्हान
