Eknath Shinde : चंद्रभागेच्या प्रदूषणमुक्तीसाठी 120 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरात घोषणा
थोडक्यात
चंद्रभागेच्या प्रदूषण मुक्तीसाठी विकास आराखडा मंजूर
120 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरात घोषणा
(Eknath Shinde) कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. मंदिराला रोषणाई करण्यात आली असून अनेक भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहे. यावेळी प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजा करण्याची संधी मिळाली.
विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता संपन्न झाली. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूरात मोठी घोषणा केली आहे.
पंढरपूरची चंद्रभागा नदी वारकऱ्यांची पवित्र गंगा आहे. ही चंद्रभागा कायमस्वरूपी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून याचाच एक भाग म्हणून नगर विकास खात्याने चंद्रभागा प्रदूषण मुक्तीसाठी 120 कोटी रुपयांचा पहिला टप्पा मंजूर केला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात दिली.
