Nagpur : नागपुरात थंडीत आंदोलन करणाऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nagpur) थंडीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची निवाऱ्याची व्यवस्था करा असे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. अधिवेशनात आपल्या मागण्या मांडण्यासाठी येणाऱ्या आंदोलनकर्त्यांना कडाक्याच्या थंडीपासून बचावकारीता निवाऱ्याची व्यवस्था करा असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले असून आपल्या मागण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.
नागरिकांना जगण्याचाही मूलभूत अधिकार आहे. त्याअंतर्गत आंदोलनकर्त्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था करणे ही राज्य सरकारचे कर्तव्य आणि जबाबदारी असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायालयाने या संदर्भात स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली असून निवारा मिळाला की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
ही समिती अधिवेशन संपेपर्यंत रोज दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना आवश्यक योजना करण्यात येत आहे का..? याबाबत पुरावे अहवाल सादर करणार.
Summery
नागपुरात अनेक आंदोलकांचं ऐन थंडीत आंदोलन
'थंडीत आंदोलन करणाऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा'
हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
