आप हरयाणातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

आप हरयाणातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की, एका बाजूला पंजाब आणि दुसरीकडे दिल्लीत आमचे सरकार आहे. आज हरयाणा मोठा बदल शोधत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये लोकांनी बदल केला. हरयाणातील सर्व ९० विधानसभा जागा स्वबळावर लढवेल; परंतु लोकसभा निवडणुका 'इंडिया' गटाचा भाग म्हणून लढल्या जातील. अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल- मेमध्ये, तर हरयाणा विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. पंजाबमध्ये आपने लोकसभा निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. तसेच गेल्या आठवड्यात ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार असल्याची घोषणा केली होती.

हरयाणा मोठ्या बदलाची वाट पाहत आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये लोकांनी हा मोठा बदल केला आणि आता तिथले लोक आनंदी आहेत. हरयाणातील जींद येथे 'आप'च्या 'बदलाव जनसभे'ला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com