“अधिकाऱ्यांना काळे फासणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करावी”
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महामार्गाच्या कामांच्या अडथळ्यासंदर्भात पत्र लिहले होते.तेव्हापासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.यावर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"एका भागात रस्ते उभारणीत कोणी त्रास देत असेल तर संपूर्ण शिवसेना दहशत पसरवत आहे हे बोलणे चुकीचे आहे.कोकणातील रस्त्यांच्या कामात अडथळे घालणारे आणि अधिकाऱ्यांना काळे फासणारयांविरोधात देखील नितीन गडकरींनी तक्रार दाखल करावी,असे म्हणून अरविंद सावंतानी राणे कुटुंबीयांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. त्यांनी याप्रकरणी पोलिसांना अहवाल मागवायला सांगितले आहे. दहशत घालणारे नक्की कोण आहेत, ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का? हे आधी पाहावे लागेल. जर कोणी शिवसेनेचा कार्यकर्ता असेल तर पक्षप्रमुख त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
वाशीम शहराचे बायपास रस्त्यांचे काम आणि मालेगाव-रिसोड महामार्गावर पैनगंगा नदीवरील उंच पुलाचे कामे अर्धवट थांबली आहेत,त्याकामात शिवसेना कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप असल्याचा पत्रामध्ये उल्लेख केला होता.वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांमुळे थांबले आहे. यामध्ये मशिनरीची जाळपोळ करण्यात आल्याची तक्रार केली केली होती.