Aryan Khan Bail Granted;जामीन मंजूर; आर्यन खानची दिवाळी ‘मन्नत’वर

Aryan Khan Bail Granted;जामीन मंजूर; आर्यन खानची दिवाळी ‘मन्नत’वर

Published on

गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्यामुळे आर्यन खान आजच तुरुंगातून बाहेर येणार आहे.आर्यन सोबत मूनमून धमेचा, अरबाज मर्चंटलाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकले आहेत. दोन्ही बाजून ऐकल्यानंतर कोर्टाने आर्यन खानला जामीन मंजूर केला आहे. मूनमून धमेचा, अरबाज मर्चंट तसेच आर्यन खान या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आलं.

मुंबई हायकोर्टानं आर्यन खानला दिलासा दिला आहे. आर्यन खानला तब्बल 26 दिवसानंतर जामीन मिळाला आहे. आर्यन खानसाठी मुकुल रोहतगी यांनी केलेल्या युक्तिवादानंतर मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com