महाराष्ट्र
आर्यन खान येणार जेलबाहेर, जुही चावला सही करण्यासाठी कोर्टात
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गुरूवारी जामीन मंजूर झाला आहे. या जामीनानंतर आज त्याची जेलमधून सूटका होणार आहे. त्याची सूटका होण्यासाठी आता पुढची प्रक्रिया सुरु झाली आहे.
आर्यन खानची सूटका होण्यासाठी आता पुढची प्रक्रिया सुरु झाली आहे. जामीन मंजूर झाल्याची ऑर्डर लवकरच ऑर्थर रोड जेलपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पुढच्या दोन तासात आर्यनची जेलमधून सुटका होण्याची दाट शक्यता आहे. तसेच आर्यन खानच्या जामिनावर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सेशन्स कोर्टात पोहोचली आहे.सेशन्स कोर्टात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडत आहे. या जामीन ऑर्डरवर जुही चावला गॅरेंटर म्हणून सही करेल. त्या सहीचे कायदपत्रे ऑर्थर रोड जेल प्रशासनाकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर आर्यनला जेलमधून सोडण्यात येईल.