Maharashtra Farmers : मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात 11 महिन्यात तब्बल 1 हजार 987 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Farmers ) राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 11 महिन्यामध्ये पश्चिम विदर्भात 973 शेतकरी आत्महत्या झाल्या तर मराठवाड्यामध्ये 1014 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
नोव्हेंबर पर्यंत पश्चिम विदर्भात शेतकरी 973 आत्महत्या झाल्याची माहिती मिळत असून मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात 11 महिन्यामध्ये तब्बल 1987 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक वास्तव आकडेवारीतून समोर आला आहे.
सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये शेतकरी आत्महत्याबाबत विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळतो का? याकडे लक्ष लागले आहे.
Summery
11 महिन्यात तब्बल 1 हजार 987 शेतकऱ्यांची आत्महत्या
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेलं नाही
हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळणार का?
