Asaduddin Owaisi : छत्रपती संभाजीनगरात असदुद्दीन ओवैसी यांची आज प्रचार रॅली; जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांचा आज मोठा बंदोबस्त
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Asaduddin Owaisi) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरात असदुद्दीन ओवैसी यांची आज प्रचार रॅली असणार आहे. या रॅलीमध्ये असदुद्दीन ओवेसी हे पायी चालत रोड शो करणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर ओवैसींच्या रॅलीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर हा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगरात असदुद्दीन ओवेसी यांची आज प्रचार रॅली
ओवैसींच्या रॅलीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
काल जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त
