Asha Sevika Andolan
Asha Sevika Andolan

Asha Sevika Andolan : आशा सेविकांचं आजपासून मुंबईत आंदोलन; प्रमुख मागण्या कोणत्या?

मुंबई महापालिकेच्या आशा सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Asha Sevika Andolan : ) मुंबई महापालिकेच्या आशा सेविका (Asha Sevika) आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. आशा सेविका आजपासून आंदोलन करणार आहेत. सकाळी 11 च्या सुमारास आझाद मैदान येथे आंदोलनाला सुरवात होणार आहे.

आज आशा सेविकांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली असून मागच्या वर्षी 45 दिवस आंदोलन केल्यानंतर शिंदे सरकारने त्यांच्या मागणी मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप आश्वासनांची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे सेविकांमध्ये तीव्र नाराजी असून याच पार्श्वभूमीवर आजपासून आंदोलन करण्यात येणार आहे.

आशा सेविकांच्या मागण्या कोणत्या ?

- 29 जुलै 2024 रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणे

- महापालिका आशासेविकांना पूर्वलक्षी प्रभावाने किमान वेतन देणे

- आशा सेविकांचा पगार दर महिन्याच्या एक तारखेला अदा करणे

- सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांच्या रिक्त जागेवर महापालिकेच्या आशासेविकांना आरोग्यसेविका म्हणून नियुक्त करणे

- ओळखपत्र आणि नियुक्तीपत्र

- स्टेशनरी अप्रॉन देणे

- कोणत्याही कामासाठी अतिरिक्त मानधन मिळण्यासंदर्भात निर्णय लादू नये

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com