Ashadhi Wari 2022 :  वारकऱ्यांना 'आषाढी वारी 2022' मोबाईल ॲपवरुन अशी मिळेल मदत

Ashadhi Wari 2022 : वारकऱ्यांना 'आषाढी वारी 2022' मोबाईल ॲपवरुन अशी मिळेल मदत

आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी आणि त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'आषाढी वारी 2022' ॲप विकसित करण्यात आले आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade

प्रशांत जगताप : आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी आणि त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'आषाढी वारी 2022' ॲप विकसित करण्यात आले आहे. (Ashadhi Wari 2022)

Ashadhi Wari 2022 :  वारकऱ्यांना 'आषाढी वारी 2022' मोबाईल ॲपवरुन अशी मिळेल मदत
धमकी देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात नागपुरात 'चप्पल मारो आंदोलन'

या ॲपमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गाचे वेळापत्रक, गावनिहाय नकाशा, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या थेट दर्शनाची सोय, पालखीचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख यांचे संपर्क क्रमांक, वैद्यकीय सुविधा त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालये व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकरी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पाण्याच्या सुविधेच्या दृष्टीने मार्गावरील टॅकर सुविधा, अन्न पुरवठा आणि वितरणबाबत, विद्युत सेवा, पशुधन बाबत सेवेसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. पालखी सोहळ्याशी संबंधित विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकदेखील या ॲपमध्ये देण्यात आले आहेत.

Ashadhi Wari 2022 :  वारकऱ्यांना 'आषाढी वारी 2022' मोबाईल ॲपवरुन अशी मिळेल मदत
St Bus | गणेशोत्सवासाठी कोकणात 2500 एसटी बसेस सोडणार

भाविकांनी गुगल प्लेस्टोवरील https://play.google.com/store/apps/details?id=com.deecto.ashadhiwari या लिंकवरुन आषाढी वारी 2022 हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. तसेच भाविकांनी वारीदरम्यान अडचणीच्या वेळी या ॲपवरील संबंधित संपर्क अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com