Ashish Shelar : 'मुंबईत मलिकांना नेतृत्व दिले, तर महायुती होणार नाही', मंत्री आशिष शेलार यांची भूमिका
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ashish Shelar) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतला आहे.
नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला भाजपचा विरोध कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिकांना नेतृत्व देऊ नये, असे भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांची भूमिका आहे.
मुंबईत मलिकांना नेतृत्व दिले, तर महायुती होणार नाही. असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आता आशिष शेलार यांच्या भूमिकेमुळे महायुतीत फुट पडल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. या भूमिकेमुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला भाजपचा विरोध कायम
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिकांना नेतृत्व देऊ नये
भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांची भूमिका
