Ashish Shelar : विकसित भारताच्या स्वप्नाकडे दमदार उड्डाण करणारा हा अर्थसंकल्प

Ashish Shelar : विकसित भारताच्या स्वप्नाकडे दमदार उड्डाण करणारा हा अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांनी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे. आशिष शेलार म्हणाले की, अर्थसंकल्पातून "विकसित भारताचे" दमदार उड्डाण !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या विजयानंतर अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी आज जाहीर केलेला अर्थसंकल्प. महिला, तरुण, विद्यार्थी, शेतकऱ्यांना भरघोस मदत करणारा, गरिबांची काळजी करणारा आणि करदात्यांना दिलासा देणारा आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, देशाची औद्योगिक उत्पादन क्षमता वाढेलच पण सोबत पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील शिवाय शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळेल असा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताच्या स्वप्नाकडे दमदार उड्डाण करणारा हा अर्थसंकल्प आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. असे आशिष शेलार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com