Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथे उमेदवाराचे प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; व्हिडिओ आला समोर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhatrapati Sambhajinagar) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे उमेदवाराचे प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असून कार्यालयाला आग लावत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. राष्ट्रवादीचे मयूर सोनवणे यांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Summary
छत्रपती संभाजी नगर येथे उमेदवाराचे प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
कार्यालयाला आग लावत असल्याचा व्हिडिओ समोर
