Bhandara : चालत्या बस मध्ये महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न...
भंडारा: तुमसर वरून भंडारा येथे येत असलेल्या बस मध्ये भंडारा शहरातील जि.प.चौक येथे 22 वर्षीय महिला आरोपीने फिर्यादी 69 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्या महिला आरोपीला एसटी बसमधून खाली उतरवरून जमलेल्या जमावाने चोप देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भंडारा पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून हा प्रसंगवाद रोखला आहे.
दरम्यान एसटी बस क्र. MH 13 CU 9360 ही बस तुमसरवरून भंडारा येथे येत असतांना या बसमध्ये फिर्यादी हेमलता शंकर वैद्य (69) आणि तिची मुलगी प्रवास करीत होते, यावेळी जि.प.चौक भंडारा येथे बस थांबली असता एका 22 वर्षीय महिला चोरट्या प्रवासीने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन साखळी चोरण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार लक्षात येताच त्या महिलेला बसमधून खाली उतरविले आणि विचारसपूस करून भंडारा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्या महिला आरोपीचे नाव नन्नू धनगो असे असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.