Avinash Jadhav : "त्याच काय ते आम्ही करु" मनसे नेते अविनाश जाधव यांचा पीडित तरुणीला पाठिंबा

कल्याण पूर्व येथे एका महिला कर्मचाऱ्यावर नशेखोर परप्रांतीय तरुणाकडून अमानुष मारहाण करण्यात आली. यादरम्यान अविनाश जाधव यांनी पीडितेच्या घरच्यांशी संवाद साधला आहे.
Published by :
Prachi Nate

कल्याण पूर्व येथे एका महिला कर्मचाऱ्यावर नशेखोर परप्रांतीय तरुणाकडून अमानुष मारहाण करण्यात आली. तिचे कपडे फाडून लाथाबुक्क्यांनी त्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. कल्याण पूर्वमधील पिसवली गावातील रहिवासी सोनाली प्रदीप कळासरे ही श्री बाल चिकित्सालय या खाजगी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. क्लिनिकमधील नियमांचे पालन करत ती तिचं काम करत होती.

मात्र तिथे एक नशेत धुंद परप्रांतीय तरुण गोकुळ झ्या नामक थेट केबिनमध्ये घुसला, सोनालीने त्याला थांबवत 'तुम्ही जरा थांबा' असं म्हटल. त्यानंतर तरुणाने शिव्या देत धक्कादायकरीत्या पळत येऊन सोनालीच्या तोंडावर लाथ मारली. यामुळे ती जमीनीवर कोसळली, त्यानंतर तिला लाथाबुक्क्यांचा भयंकर मारा करण्यात आला.

या घटनेनंतर मनसे नेते अविनाश जाधव काही वेळातच पीडित कुटुंबाच्या घरी भेट देऊन पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेले. तसेच यानंतर पीडित मुलीच्या घरी मनसेचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. यादरम्यान अविनाश जाधव यांनी पीडितेच्या घरच्यांशी संवाद साधला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com