Babanrao Taywade : "कोर्टाचा निर्णय विरोधात आल्यास हजारो ओबीसी कार्यकर्त्यांचे नुकसान"; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणीवर बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Babanrao Taywade ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर यावर बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बबनराव तायवाडे म्हणाले की, 50 टक्केच्या आत ओबीसींना आरक्षण देऊन निवडणुका घ्या. एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाणे अपेक्षित आहे. कोर्टाचा निर्णय जर विरुद्ध आला तर ओबीसी चे नुकसान होणार आहे. हजारो ओबीसी कार्यकर्त्यांचे नुकसान होऊ शकते. असे बबनराव तायवाडे म्हणाले.
Summery
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार
"50 टक्केच्या आत ओबीसींना आरक्षण देऊन निवडणुका घ्या"
"कोर्टाचा निर्णय विरोधात आल्यास हजारो ओबीसी कार्यकर्त्यांचे नुकसान"
