Devendra Fadnavis
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यांसह 17 वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
(Devendra Fadnavis ) शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यांसह 17 वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. बच्चू कडू यांचे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये आंदोलन सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल, त्या समितीमध्ये बच्चू कडूंना घेऊ आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, असं आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिलं.