गुवाहाटीला जाण्यामुळे झालेल्या बदनामीची परवा नाही : बच्चू कडू

गुवाहाटीला जाण्यामुळे झालेल्या बदनामीची परवा नाही : बच्चू कडू

बदनामीच्या बदल्यात आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळाले; सांगलीत दिव्यांग बांधवांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बच्चू कडूंचे विधान
Published by :
Team Lokshahi
Published on

संजय देसाई|सांगली: गुवाहाटीला जाण्यामुळे आम्ही बदनाम झालो. पण, या बदनामीची आम्हाला परवा नाही, कारण बदनामीच्या बदल्यात आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं, असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे. सांगलीत दिव्यांग बांधवांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते. यावेळी दिव्यांग मंत्रालय कसे स्थापन झाले हे बच्चू कडूंनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्याकडे मी दहावेळा दिव्यांग मंत्रालय उभारा ही मागणी केली पण ती पूर्ण झाली नाही. यामुळे दिव्यांग मंत्रालय काही स्थापन झाले नाही. योगायोगाने गुवाहाटीला जाण्याचा योग आला आणि यावेळी देवेंद्र फडणीस यांनी फोन करून आपल्या सोबत यावं असं म्हटलं. मी तुमच्यासोबत येतो पण दिव्यांग मंत्रालय स्थापन करत असाल तरच येतो नाहीतर तुमच्यासोबत येत नाही, असे मी निक्षून सांगितले.

दुसऱ्यांदा गुवाहाटीला गेलो त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी सांगितले की तुम्हाला दिव्यांग मंत्रालय स्थापन करायचा शब्द पूर्ण करायला हवा. तेव्हा मुख्यमंत्री शिंदेंनी थेट मुख्य सचिवांना फोन करून कॅबिनेटची नोट बनवायली सांगितली. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे दिव्यांग मंत्रालय दिल्याबद्दल देखील बच्चू कडूंनी आभार मानले.

महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग तसेच सांगली जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद आणि सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग कल्याण विभागाकडून धनंजय गार्डन येथे आयोजित दिव्यांगाच्या दारी अभियान 2023 अंतर्गत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com