Bacchu Kadu : मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनानंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
थोडक्यात
- शेतकरी कर्जमाफीसंदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक 
- 'शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 
- कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनानंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले... 
(Bacchu Kadu) कर्जमाफी, सातबारा कोरा आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारलेलं. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावून बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करत येत्या 30 जून 2026 पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, "समिती ही नाममात्र झालेली आहे. कर्जमुक्तीची तारीख घ्यायला आम्ही आलो होतो. आता तारीख दिलेली आहे. आता कर्जमाफी कशा पद्धतीने घ्यायची आणि किती चांगली करायची ही जबाबदारी आमची आहे. त्यासाठी बच्चू कडू जीवाचं रान करेल." असे बच्चू कडू म्हणाले.

