महाराष्ट्र
Bachchu Kadu Amravati Protest : शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक, आयुक्तांच्या कार्यालयावर धडकणार
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बच्चू कडू आक्रमक, अमरावतीत आयुक्तांच्या कार्यालयावर धडकणार. केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत, हिंदू शेतकऱ्यांच्या समस्यांवर संतप्त सवाल.
पश्चिम विदर्भात वर्षभरात तब्बल 1151 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली उडालीये. शेतकरी आत्महत्येवरुन बच्चू कडू यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदू शेतकऱ्यांची संख्याच जास्त आहे. राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. मग तरीही हिंदू शेतकऱ्यांवर स्वत:ला संपवण्याची वेळ का येते? असा संतप्त सवाल बच्चू कडूंनी सरकारला विचारलाय.