Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत बागेश्वर बाबा म्हणाले...: Bageshwar Baba

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत बागेश्वर बाबा म्हणाले...: Bageshwar Baba

छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा दरबार भरणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा दरबार भरणार आहे. 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबरला अयोध्यानगरी मैदानावर भव्य कार्यक्रम सुरू आहे. यावेळी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा दरबार सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषद पार पडली.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांना मराठा आरक्षणावर प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत बागेश्वर बाबा म्हणाले की, भारत जेव्हा गुलामीत होता, तेव्हा भारताला गुलामीतून स्वतंत्र करण्याचे उपकार मराठा समाजानं केले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. असे बागेश्वर बाबा म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या दरबाराला अंधश्रद्धा निर्मुलन सिमतीनं विरोध दर्शवला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com