महाराष्ट्र
Balwant Wankhade : अमरावतीत ओला दुष्काळ जाहीर करावा
अमरावती जिल्हाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्वरीत जिल्ह्याचा दौरा करावा आणि पीक पाहणी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
सूरज दहाट, अमरावती
अमरावती जिल्हाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्हाचा दौरा करून पीक पाहणी करावी व जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे.
बळवंत वानखडे म्हणाले की, पिकाची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. शेतकरी खूप मोठ्या संकटात आहेत. अशा परिस्थितीत अमरावती जिल्हाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्वरीत जिल्ह्याचा दौरा करावा आणि पीक पाहणी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. जो शेतकरी खूप संकटात आहे. संत्र्याचे खूप नुकसान झालं आहे. केळीचं नुकसान आहे. म्हणून या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहावे. असे बळवंत वानखडे म्हणाले.