महाराष्ट्र
Bank Employees Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; 'या' तारखेला जाणार संपावर
बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप पुकारला आहे.
बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप असणार आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत इंडियन बँक्स असोसिएशनबरोबर चर्चा केली मात्र काही तोडगा निघत नसल्याने बँक कर्मचाऱ्यांकडून संघटनांनी येत्या 24 आणि 25 मार्चला देशव्यापी संप करण्यात येणार आहे.
नोकरभरती तातडीने करावी, त्याचबरोबर 5 दिवसांचा सप्ताह सुरू करण्याच्या मागण्यांसाठी, ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी हा संप असल्याचं संघटनेतर्फे सांगण्यात आलं आहे.