Bank Holidays : बँकांतील कामांचे आत्ताच नियोजन करा; जुलै महिन्यात बँकांना तब्बल 13 दिवस सुट्टी, पाहा संपूर्ण यादी
(Bank Holidays ) जुलै महिन्यामध्ये बँकेशी संबंधित व्यवहार करायचा असेल तर तो लवकरात लवकर करा कारण जुलै महिन्यात तब्बल 13 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. सण-उत्सव व साप्ताहिक सुट्टया यामुळे तब्बल 13 दिवस बँका बंद असणार आहे. या दिवसांच्या सुट्ट्यांमुळे या महिन्यात बँकांमध्ये लोकांच्या रांगाच रांगा लागण्याची शक्यता आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने ह्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून यानुसार कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या दिवशी सुट्टी असणार आहे याची माहिती ही यात नमूद करण्यात आली आहे. जुलै महिन्यात चार रविवारी म्हणजेच 6, 13, 20 आणि 27 जुलै रोजी सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील. याशिवाय 12 जुलै रोजी दुसऱ्या शनिवारी आणि 26 जुलै रोजी चौथ्या शनिवारी असल्याने बँका बंद असणार आहेत.
याशिवाय देशातील इतर राज्यांमध्ये काही धार्मिक सणांमुळे विविध राज्यातील बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामध्ये 3 जुलै रोजी खारची पूजानिमित्त आगरतळामध्ये बँका बंद राहतील. 5 जुलै रोजी गुरु हरगोबिंद सिंहजी यांच्या जयंतीनिमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकांना सुट्टी असेल. 14 जुलै रोजी बकरी ईद (ईद-उल-अजहा) नंतरचा दिवस असल्याने शिलाँगमध्ये बँका बंद राहतील. 16 जुलै रोजी हरेला सणानिमित्त देहरादूनमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. 17 जुलै रोजी यू तिरोत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमध्ये बँकांना सुट्टी असेल. 19 जुलै रोजी केर पूजेनिमित्त आगरतळामध्ये बँकांना सुट्टी असेल. तर 28 जुलै रोजी द्रुक्पा त्से-जी सणानिमित्त गंगटोक सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.