Pandharpur
Pandharpur team lokshahi

Pandharpur : करमाळ्यातील जेऊर येथे मुख्यमंत्री आणि भाजप खासदार यांचे बॅनर फाडले...

करमाळा जवळच्या जेऊर येथे आज एकनाथ शिंदे, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अभिनंदनाचा लावलेला बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे‌.
Published by :
Team Lokshahi
Published on

अभिराज उबाळे|पंढरपूर: करमाळा जवळच्या जेऊर येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अभिनंदनाचा लावलेला बॅनर समाजकंटकांनी फाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे‌.

जेऊर येथील विविध विकास कामांना निधी मंजूर केल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे अभिनंदन बॅनर लावले होते. दरम्यान येथील ग्रामपंचायत कर्मचारी समीर शेख यांच्या सांगण्यावरून बापू जाधव व‌ सागर कांबळे यांनी बॅनर फाडल्याची तक्रार बाळासाहेब करचे यांनी जेऊर पोलिस ठाण्यात दिली आहे.

या घटने जेऊर येथे तणाव निर्माण झाला परिस्थिती नियंत्रणात आहे. शिवसेनेच्या दोन गटात अंतर्गत वादातून ही घटना घडल्याची चर्चा सूरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com