Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana : माळेगाव सहकारी साखर कारखाना रणधुमाळी; उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?
(Baramati Malegaon Sakhar Karkhana ) माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी काल 22 जून 2025 रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र शरद पवार यांनी मतदान केलं नाही.
या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल यांचा समावेश आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची एकूण मतदारसंख्या 19 हजार 651 इतकी आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सुमारे 88.48 टक्के मतदान झाले असून, ब वर्गासाठी 99 टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत मतदारांनी कोणाला पसंती दिली, हे उद्या (24 जून) रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे मतदारांची पसंती कोणाला? हे उद्या स्पष्ट होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.