Ahmednagar : निवडणुकीच्या पराभवाचा राग मनात ठेवून महिला सरपंचाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला...

Ahmednagar : निवडणुकीच्या पराभवाचा राग मनात ठेवून महिला सरपंचाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला...

सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याचा राग मनात ठेवून महिला सरपंच आणि त्यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

संतोष आवारे|अहमदनगर: सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याचा राग मनात ठेवून महिला सरपंच आणि त्यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार आहे. हा प्रकार पाथर्डी तालुक्यातील वैजु बाभूळगावात घडला आहे. सदर महिला सरपंचांचे नाव ज्योती संतोष घोरपडे आहे. आरोपींना अटक करावी या मागणीसाठी वैजु बाभूळगावच्या सरपंच आणि गावातील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचे शल्य मनात ठेवून वैजु बाभूळगावातील गावगुंड बाळासाहेब घोरपडे, ज्ञानेश्वर घोरपडे,साईनाथ घोरपडे, आंबादास घोरपडे, उत्तम घोरपडे,नितीन घोरपडे, सुशील घोरपडे, गणेश घोरपडे यांनी सरपंच ज्योती घोरपडे यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ज्योती घोरपडे यांच्यासहित त्यांची मुले आणि पती गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याची व्हिडिओ क्लिप सुद्धा आता चांगलीच व्हायरल होत आहे. मात्र तरीही पोलीस या आरोपींना अटक करत नसल्यामुळे अखेर महिला सरपंचासह ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

जोपर्यंत या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील तसेच सरपंच पदासह इतर सदस्य सामूहिक राजीनामे देऊन या घटनेचा निषेध करणार असल्याचेही सरपंच ज्योती घोरपडे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com