मराठा आरक्षणासाठी 'या' जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींचा निवडणुकीवर बहिष्कार; मतदान प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की

मराठा आरक्षणासाठी 'या' जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणुकीवर बहिष्कार; मतदान प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की

राज्यात आज एकूण 2359 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींनी निवडणूक मतदानावर बहिष्कार घातला आहे.

विकास माने | बीड : राज्यात आज एकूण 2359 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींनी निवडणूक मतदानावर बहिष्कार घातला आहे. यामुळे तेथील मतदान प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की प्रशानासनावर ओढवली आहे.

मराठा आरक्षणासाठी 'या' जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींचा निवडणुकीवर बहिष्कार; मतदान प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की
दादांचं मतपरिवर्तन झालं तर त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण होईल; वडेट्टीवारांच्या विधानाची चर्चा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. यामुळे या ठिकाणची मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आज जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असताना या 18 गावांमध्ये मात्र शुकशुकाट आहे.

पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय येथे नऊ सदस्य आणि सरपंच पदासाठी निवडणूक होणार होती. परंतु, ग्रामस्थांनी बैठक घेऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले. आगामी काळातही ज्या निवडणुका होतील त्यामध्ये सहभाग होणार नसल्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उोपषण सुरु केले होते. मात्र, सरकारच्या शिष्टाईला यश आले असून जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केले आहे. यासोबतच जरांगेंनी सरकारला आरक्षणासाठी नवी डेडलाईन दिली आहे. तसेच, तोपर्यंत साखळी उपोषण सुरु ठेवण्याचेही स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com