Beed
Beed

Beed : बीडमध्ये ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी काढली गर्भपिशवी; धक्कादायक बाब आली समोर

(Beed ) बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Beed ) बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. याच बीड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बीडमध्ये 843 महिलांनी गर्भपिशवी काढल्याची माहिती मिळत आहे. ऊसतोडीला जाण्यापूर्वी या 843 महिलांनी गर्भपिशवी काढली आहे.

यामध्ये सर्वाधिक महिला 30ते 35 वयोगटाच्या असल्याची माहिती मिळत असून बीड जिल्ह्यामधून दरवर्षी 1 लाख 75 हजार मजूर ऊसतोडीच्या कामाला जात असतात. यामध्ये 1523 महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करत असल्याचे उघड झाले आहे.

ऊसतोडणीला जाण्यापूर्वी आणि ऊसतोडणी करुन आल्यावर महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. यात महिलांना विविध आजार असल्याचे समोर आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com