Beed Accident
महाराष्ट्र
Beed Accident : बीडच्या गेवराईमध्ये भीषण अपघात, अपघातातून वाचले पण...; 6 जणांचा मृत्यू
(Beed Accident ) बीडच्या गेवराईमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
(Beed Accident ) बीडच्या गेवराईमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र डिव्हायडरमध्ये गाडी अडकली होती.
ही गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले आणि त्याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक दिली आणि यातच सहा जणांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थाळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली असून गेवराई गावावर शोककळा पसरली आहे.