महाराष्ट्र
‘प्रत्येक महापुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही’ – श्रीनिवास पाटील
लोकशाही न्यूज नेटवर्क | राष्ट्रवादीचे नेते सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. या प्रकरणावरुनच आता राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारत 'प्रत्येक महापुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असे नाही', असे म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे मुंडेंच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. आता या प्रकरणी जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

