Bhandup Best Bus Accident
Bhandup Best Bus Accident

Bhandup Best Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; चालक संतोष सावंतविरोधात गुन्हा दाखल

भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Bhandup Best Bus Accident) भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू आणि 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर साधारण रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमींना राजावाडी रुग्णालय आणि इतर खाजगी रुग्णालयात सुद्धा नेण्यात आले आहे.

बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत असून दोन्ही इलेक्ट्रिक बस असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी आता बेस्ट चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

अपघाताचे सर्व सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चालक संतोष सावंतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Summery

  • भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात

  • चालक संतोष सावंतविरोधात गुन्हा दाखल

  • अपघातात 4 जणांचा मृत्यू आणि 10 जण गंभीर जखमी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com