BEST Credit Society Election : बेस्ट मतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान

बेस्ट मतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान असून 9 वाजल्यापासून हे मतदान सुरू होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

(BEST Patpedhi Election) बेस्ट मतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान असून 9 वाजल्यापासून हे मतदान सुरू होणार आहे. ठाकरे बंधू विरुद्ध भाजप अशी लढत या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे.

ठाकरे बंधूंचे उत्कर्ष पॅनल तर भाजपचं सहकार समृद्धी पॅनल असणार असून यासोबत शशांकराव पॅनल आणि बेस्ट परिवर्तन पॅनल सुद्धा या निवडणुकीत आहे. संचालक मंडळाची निवडणूक मतदान प्रक्रिया आज पार पडणार असून मतमोजणी उद्या होणार आहे. आता उद्या 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी झाल्यावर कोणते पॅनल बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com