BEST Workers
BEST Workers

BEST Workers : आजपासून बेस्ट कर्मचारी आणि सरचिटणीस शशांक राव उपोषणाला बसणार

बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे बेस्टने थकवले असल्याचे कर्मचाऱ्यांचं म्हणणं
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल

  • बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे बेस्टने थकवले

  • आजपासून बेस्ट कर्मचारी आणि सरचिटणीस शशांक राव उपोषणाला बसणार

(BEST Workers) आजपासून बेस्ट कर्मचारी आणि सरचिटणीस शशांक राव उपोषणाला बसणार आहेत. बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल होत असून निवृत्त कर्मचाऱ्यांचे बेस्टने पैसे थकवले असल्याचे बोलले जात आहे.

साडेचार हजारांहून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांची सातशे कोटी थकबाकी, ग्रॅज्युटी, कोव्हीड भत्ता थकीत असून कर्मचारी त्रस्त आहेत. स्वर्गवासी झाल्यावर पैसे देणार का? असा सवाल संतप्त कर्मचाऱ्यांकडून विचारण्यात येत आहेत.

एवढा पैसा नेमका जातो तरी कुठे? असं म्हणत कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून बेस्ट कर्मचारी आणि सरचिटणीस शशांक राव उपोषणाला बसणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com