Kolhapur
महाराष्ट्र
Kolhapur : कोल्हापूरातील भानामतीचा प्रकार; दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडलं
कोल्हापूरातील स्मशानभूमीत भानामती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kolhapur) कोल्हापूरातील स्मशानभूमीत भानामती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोल्हापूरच्या वडगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून
भानामती करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याची माहिती मिळत आहे. आरोपींचे अन्य तीन साथीदार पसार झाले असून गुलाल, टाचणी टोचलेले लिंबू, तसंच काही फोटो आणि अन्य साहित्य ठेवून पूजा सुरू असल्याची माहिती मिळत असून गावातील पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Summary
कोल्हापुरातील भानामतीचा प्रकार
कोल्हापूरच्या वडगावमधील धक्कादायक घटना
भानामती करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडलं
