Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी; भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhatrapati Sambhajinagar)जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून रोजी 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू झाली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 जागांसाठी जवळपास 1 हजार इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे.
भाजप युतीसाठी शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी
भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड
1 हजार इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारी मागितली
