सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली

सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली

सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमोल धर्माधिकारी, पुणे

सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. खडकवासलातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूल पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे. खडकवासला धरणातून 20 हजार क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भिडे पुलाजवळ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता नदीपात्रात जाऊ नये असे प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com